आलापल्ली वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

6

– खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन केली उपोषणकर्त्यांशी चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १८ ऑगस्ट : अहेरी तालुक्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस आहे. दरम्यान आज, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज, १८ ऑगस्ट रोजी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

आलापल्ली वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, आलापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांना निलंबित करावे, आदी मागण्यांसाठी ९ ऑगस्टपासुन आंदोलन सुरू केले आहे. सलग दहाव्या दिवशी खासदार अशोक नेते यांनी या ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन या संबंधित योग्य ती कार्यवाही केली जाईल. हा प्रकार वरिष्ठ अधिकारी यांच्या बोलून निकाली काढण्याचा माझा प्रयत्न राहील. निश्चितच आपणांला योग्य न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.

यावेळी वनविभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक रमेश कुमार, जनता टाईम्स फाउंडेशन संचालक / जनता टाईम्स विदर्भ ब्युरोचीफ शंकर ढोलगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, गडचिरोली अखिल भारतीय सरपंच परिषद म.रा. जिल्हा अध्यक्ष योगाजी कुडवे व आंदोलनकर्ते उपस्थित होते.