संघर्षनगरचा (स्नेहनगर) सर्वांगीण विकास करणार : प्रमोदजी पिपरे

38

– संघर्षनगर (स्नेहनगर) येथे प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संघर्षनगराच्या (स्नेहनगर) विकासाकरिता सर्वतोपरीने विकास करण्याचा आपला प्रयन्त असून संघर्षनगरामध्ये शौचालय, विद्युत लाईन, घरटॅक्स लावण्यात आले आहेत. तसेच सिमेंट रस्ते, सर्वांना कायमचे पट्टे (गावठाण सर्व्हे), आखीव पत्रिका मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार असून संघर्षनगर येथील समस्यांचे लवकरच निवारण करणार असल्याचे प्रतिपादन लोकसभा समन्वयक तथा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने शहरातील संघर्षनगर (स्नेहनगर) येथे गडचिरोली -चिमुर लोकसभा समन्वयक तथा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडी जिल्हा प्रभारी सौ. योगीताताई पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, रश्मी बानमारे, पुनम हेमके, देवेंद्रजी लाटकर, विलास नैताम, रामन्नाजी बोनकुलवार, नरेंद्रजी भांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संजय बोधलकर, सोमेश भोयर, गणेश बोबाटे, देवचंद खैरे, गिरीश मुरमुरवार, यादव कौशल, तुकाराम खोब्रागडे, विनोद लटारे, मार्कंडी कुकुडकर, रामभाऊ नैताम, रवींद्र हजारे, चंदू कोडापे, सुनील बन्सोड, कुसुमबाई नैताम, काजल पिपरे, संगीता बोधलकर, छायाबाई भोयर, चंदा सोनटक्के, विमलताई क्षीरसागर, उज्वला बोबाटे, वेणुताई लाटकर, रंजना खैरे, शिल्पा लटारे, सईबाई बुरांडे, कुमारी कौशल, अर्चना मुरमुरवार, सुनंदा हजारे यांनी केले. यावेळी संघर्षनगर येथील बहुसंख्येने प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग व बालगोपाल उपस्थित होते.