खा. अशोक नेते यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

240

– व्याहाड बुज‌, सामदा, सोनापूर, घोडेवाही येथे कुदळ मारून केले कामाचे भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, १७ ऑगस्ट : गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा अंतर्गत २.६० (दोन कोटी साठ लक्ष रूपये) रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सावली तालुक्यातील सामदा बूज, सोनापूर, व्याहाड बूज, घोडेवाही येथील जनसुविधा अंतर्गत मंजूर कामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सामदा बुज, व्याहाड बुज व कोंडेखल येथे खासदार अशोक नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कमिटीने स्वागत केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी गावांतील समस्या, प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे समस्या, शेतकऱ्यांचे विषय जाणुन घेत, शेतकऱ्यांविषयी संवेदनशील विचार व्यक्त करत नहराच्या पाईपलाईन संबंधित तात्काळ सिंचाई विभागाचे अधिकारी व गोसीखुर्द अधिकारी यांच्या समेत बैठक घेण्या संबंधित सुचना केल्या व लवकरात लवकर यासंबंधी बैठक आयोजित केली जाईल. सदर बैठकिला सिंचाई विभागाचे अधिकारी, तहसीलदार,बिडिओ, गोसीखुर्द अधिकारी, कृषि विभाग अधिकारी, ग्रामिण रुग्णालय अधिकारी, विद्युत महावितरण अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देशित सूचना केल्या.

यावेळी खासदार तधा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, सावलीचे बिडीओ वासनिक, नायब तहसीलदार मंथनवार, सहाय्यक बिडिओ तेलकापलीवार, विस्तार अधिकारी देवतळे, कृषि अधिकारी अश्विनी घोडसे, कृ.उ.बा.समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार, जेष्ठ नेते अरुण पाल, माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार, भाजपाचे युवा सामाजिक नेते किशोर वाकुडकर, सामदाच्या सरपंच शुभांगी मडावी, माजी सरपंच देवानंद पाल, व्याहाड बुजच्या सरपंच कविता बोलीवार, सोनापूरच्या सरपंच जयश्री मडावी, उपसरपंच परशुराम भोयर, उपसरपंच मुकेश भुरसे, उपसरपंच नरेश बाबणवाडे, उपसरपंच चेतन रामटेके, ग्रा. प. सदस्य तथा खासदार महोदयांचे सहाय्यक दिवाकर गेडाम, सदस्या प्रणिता तोडेवार, ग्रा. प. सदस्य प्रकाश नागापुरे, सदस्य शरद मडावी, सदस्या उषा पोहनणकर, सुखदेव मोहुरले, सदस्य विशाल वाढणकर, अनुराग लेनगुरे, प्रविण पोहणकर, अमोल पिपरे, कुकडे महाराज, प्रशांत मडावी, डॉ. तोडेवार, दासरवार, ग्रामसेवक बांगडे, तुळशीदास भुरसे, सुधाकर म्याकलवार, राजु गेडाम, कानू गेडाम, महादेव वाढई, साईनाथ संदोकर, देवराव गोहणे, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.