हेमंत डोर्लीकर व संतोष सुरपाम यांची गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी निवड

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १७ ऑगस्ट : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे घेण्यात आलेल्या बैठकीत गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा) च्या संयोजकपदी हेमंत डोर्लीकर व संतोष सुरपाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

बदलत्या काळानुसार देशभरात ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेनुसार अनेक कामे डिजिटल झाली आहेत. त्याचबरोबर दैनंदिन घडामोडी, बातम्या या बाबतीतही डिजिटल मीडियाचा व्याप वाढलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही डिजिटल मीडियाचा व्याप मोठ्या प्रमाणात असून डिजिटल मीडियाविषयी नवनवीन धोरण, कार्यप्रणाली, डिजिटल मीडियाशी निगडित पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्या शासन दरबारी मांडता याव्यात याकरिता गडचिरोली येथे ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ या संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा) या संघटनेच्या कार्यकारिणीत संयोजक म्हणून हेमंत डोर्लीकर व संतोष सुरपाम यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज), मनीष कासर्लावार (विदर्भ न्युज एक्सप्रेस), व्यंकटेश दुडमवार (गोंडवाना टाइम्स न्युज), मुक्तेश्वर (बाळू) म्हशाखेत्री (विदर्भ क्रांती न्युज), किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज), जगदीश कन्नाके (महाराष्ट्र टुडे न्युज), कैलास शर्मा (महाराष्ट्र माझा न्युज), अनिल बोदलकर (एव्हीबी न्युज), प्रवीण चन्नावार (वृत्तवाणी), उदय धकाते (महाभारत न्युज), संदिप कांबळे (लोकशाही न्युज) यांची निवड करण्यात आली आहे.

सध्याच्या घडीला झटपट बातमी पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडियाकडे बघितले जाते. कोणतीही घटना, बातमी अथवा घडामोडी झटपट ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित करून सेकंदात वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने करित आहेत. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूजला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत असून वाचकांचा कलही वाढताना दिसत आहे.