लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनतर्फे आंतरशाळा क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन

24

– मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीच्या भव्य पटांगणावर 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत 28 टीमने सहभाग नोंदविला असून त्यामध्ये तालुक्यातील डुम्मे, तोडसा, परपंगुडा, हेडरी, उडेरा, तसेच तालुका बाहेरून 13 टीमने सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये प्रथम पारितोषिक 25,000 रुपयाचा मानकरी गडचिरोली क्रिकेट क्लब ठरला असून दुसरे 20,000 रुपयांचे पारितोषिक भगवंतराव क्रिकेट क्लब, तिसरे 15,000 रुपयांचे पारितोषिक प्रणय इलेव्हन, चौथे  10,000 रुपयांचे पारितोषिक जय बजरंग क्रिकेट क्लबने पटकाविला आहे. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि मॅन ऑफ द मॅचच्या मानकऱ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंचावर भगवंतराव कला व विज्ञान प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे, प्रा. कोंगरे, लॉयड मेटल्सचे मानव विकासचे प्रबंधक दिलीप बुराडे, एटापल्ली तालुक्याचे जेष्ठ नागरिक दत्ताजी राजकोनडावर, राजा सर, बांधकाम सभापती राघव सुलवावार, नगरसेवक निझान पेंदाम, संजय चांगलानी, अभय पुण्यामुर्तीवर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन किशोर बुरबुरे यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.