भाजपच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत गडचिरोली शहरात कलश व तिरंगा यात्रा

35

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १७ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने मेरी माटी, मेरा देश, मिट्टी को नमन, विरो को वंदन या कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथून कलश व तिरंगा यात्रेचे प्रारंभ करण्यात आले. शहरातील मुख्य मार्गाने कलश व तिरंगा यात्रा काढून चामोर्शी रोडवरील खासदार अशोकजी नेते यांच्या कार्यालयात यात्रेचा समारोप करण्यात आला. यादरम्यान कारगिल स्मारक समितीचे अध्यक्ष उदय धकाते यांच्याकडून माती भरलेले कलश आमदार डॉ. देवराव होळी, प्रमोदजी पिपरे, गोविदजी सारडा यांना दिले. हे कलश समोरोपीय कार्यक्रमाच्या वेळी तिरंगा यात्रेचे संयोजक अनिल तिडके यांना सुपूर्त करण्यात आले.

आमदार डॉ. देवराव होळी, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, महामंत्री अनिल तिडके, मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात कलश व तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. भारत खटी, तालुका समन्वयक विलास भांडेकर, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, विवेक बैस, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, श्रीकांत पतरंगे, संजय मांडवगडे, आशिष कोडाप, हर्षल गेडाम, मंगेश रणदिवे, देवाजी लाटकर, नरेश हजारे, संजय बोधलकर, नरेंद्र भांडेकर, मीनाताई कोडाप, वैष्णवी नैताम, लता लाटकर, अर्चना निंबोळ, पूनम हेमके, पल्लवी बारापात्रे, लक्ष्मीताई कलंत्री, सौ. बैस, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने कलश व तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते.