विधानसभा विरोधीपक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांचे गडचिरोलीत होणार जल्लोषात स्वागत

56

– महाविकास आघाडीचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लोकनेते विकासपुरुष राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहेत. त्यानिमित्ताने गडचिरोली महाविकास आघाडीच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्या संबंधित गांधी चौकातील रेस्ट होऊसमध्ये नियोजन बैठक पार पडली. ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आगमन आरमोरी रोडवर होणार आहे. त्यानंतर मार्केट लाईनमधून त्यांची रॅली निघणार असून इंदिरा गांधी चौकातील सभागृहात सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला 2 ते 3 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

सदर नियोजन बैठकीला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. रामभाऊ मेश्राम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, युवा नेते राकेश नागरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, माजी नगरसेवक नंदू कायरकर, माजी नगरसेवक शेखर आखाडे, ऍड. दुगा, उमाजी वासाडे, पंकज बारसिंगे, कल्पक मुप्पीडवार यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.