धान पिकामध्ये ॲझोलाचा वापर

13

विदर्भ क्रांती न्यूज

चामाेर्शी, 12 ऑगस्ट : ॲझोला ही पाणवनस्पती हिरवळीचे खत म्हणून धान पिकात वापरली जाते. ‘ॲनाबिना ॲझोली’ नावाचे निळे हिरवे शेवाळ ॲझोलासोबत सहजीवी पद्धतीने वाढते. ॲझोला वनस्पती हवेतील नत्र स्थिर करते. धान (भात) हे पूर्व विदर्भामध्ये खरीप हंगामात घेतलेले जाणारे प्रमुख पीक आहे. धान पिकाच्या उत्पादन वाढीकरिता रासायनिक खतांसोबतच हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो. हिरवळीच्या खतासाठी धैंचा, सोनबोरू व इतर पिकांची लागवड करून चिखलणीवेळी ही पिके जमिनीमध्ये गाडतात. कमी खर्चाचे आणि उत्तम हिरवळीचे खत म्हणून धान पिकात ॲझोलाचा (Azolla) वापर करता येतो. ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत टाकल्यानंतर लवकर कुजतो.

ऍझोला पाणवनस्पती ही बहुगुणकारी वनस्पती असून शेतकऱ्यांनी आपल्या घराशेजारी सावलीमध्ये या पानवनस्पतीचे संगोपन करावे. ही वनस्पती हिरवळीचे खत म्हणून उपयोगात आणता येते. या पाणवनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिर करणारी ऍनाबीना ऍझोली नावाची नील-हरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदेशीर ठरत असते.

याप्रसंगी कुरुड येथील श्री. विनोद मडावी, राकेश मुरकुटे, दिपक भांडेकर, विलास सातपुते, देवराव सातपुते हे शेतकरी उपस्थित होते. हा उपक्रम प्राचार्य डॉ. आदित्य कदम, सहायक प्रा. छबील दुधबळे, सहायक प्रा. तुळशीदास बारसकर, सहायक प्रा. श्रीकांत सरदारे, सहायक प्रा. अमोल डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. यावेळी विद्यार्थिनी वैष्णवी बुध्देवार, वैभवी पोफळी, गौरी चौधरी, श्रुतीका लोहकरे आणि तृप्ती घटे यांची उपस्थिती होती.