युवक काँग्रेसतर्फे कारवाफा येथे युवा जोडो अभियानाला सुरुवात

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे क्रांती दिवस, जागतिक आदिवासी दिन आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त युवा जोडो अभियानाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव विश्वजीत कोवासे यांच्या हस्ते सुरुवात  करण्यात आली. उपस्थितांना येणाऱ्या काळामध्ये एकसंघ राहुन केंद्रातील जातीयद्रुविकरण, द्वेश, हिंसा पसरवणाऱ्या शक्ती विरुद्ध लढण्याचे आणि केंद्रातील व राज्यातील सरकारच्या जनविरोधी नीती विरोधात लढा देऊन युवा क्रांती घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युकॉंचे जिल्हा महासचिव नितेश राठोड, मनोहर बावणे, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जिल्लेवार, कारवाफाचे उपसरपंच विजय बहिरवार, रामचंद्रजी मडावी, परसे, बाजीराव गावडे, आबीद शेख, लखन पेडलवार, प्रभाकर कुमोटी, मयुर मामीडवार, नरेंद्र मडावी, राकेश मडावी, अक्षय मामीडवार, नयन खोब्रागडे, गौरव खोब्रागडे, आशिष मेश्राम, जावेद शेख, हार्दिक खोब्रागडे, करण पेंडलवार, समीर रायपुरे, अतुल मामीडवार, आकाश मामीडवार, रतन बहिरवार, जुनैद पठाण, मंगेश बावणे, मशरू गावळे, अरुण जिल्लेवार, गुरुदास मेश्राम, गजानन बहिरवार, मेहबूब पठाण, विजय बाबनवाडे, प्रभाकर मार्गोनवर, राजेराम आतला, बाबुराव पदा व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.