लायन्स क्लब कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न

45

– अध्यक्षपदी लाॅ. सतीश पवार यांची निवड

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लायन्स गडचिरोली क्लबचा 2023-24 या वर्षासाठीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा हॉटेल लेक व्ह्यू येथे शनिवार 5 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात लायन्स क्लब गडचिरोलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष लॉ. सतीश पवार यांनी शपथग्रहण करुन आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.

लायन्स क्लब गडचिरोली सदस्यांच्या पदग्रहण व शपथविधी समारंभासाठी इंस्टाॅलेशन ऑफीसर म्हणून प्रांतपाल एमजेएफ लॉ. राजेंद्रजी मिश्रा, प्रमुख अतिथी म्हणून द्वितीय प्रांतपाल एम. जे. एफ. लॉयन भरत भलगट, रिजन चेअरमन रामकुमार झाडे, झोन चेअरमन लॉयन विकास घाटे आदी मान्यवर विशेष पाहुणे म्हणून लाभले होते.

याप्रसंगी गडचिरोली क्लबच्या नवीन सदस्यांचा शपथविधी व अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचे पदग्रहण करण्यात आले. मागील वर्षीच्या कार्यकारिणी मधील अध्यक्ष लॉ. डॉ. सविता सादमवार, सचिव लॉ. महेश बोरेवार, कोषाध्यक्ष लॉ. ममता कुकडपवार यांनी आपल्या पदाची सुत्रे नविन कार्यकारिणीच्या हाती दिली. लायन्स क्लब गडचिरोलीचे नवनिर्वाचित सतीश पवार, उपाध्यक्ष लॉ. मंजुषा मोरे, सचिव लॉ. किशोर चिलमवार, कोषाध्यक्ष लॉ. नितीन चेंबुलवार यांनी शपथग्रहण करुन आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. तसेच नवीन कार्यकारिणी मधील ज्येष्ठ तथा इतर पदाधिकरांची नियुक्ती करण्यात आली.
पूर्व प्रांतपाल एम. जे. एफ. लॉ. राजेंद्रजी मिश्रा, द्वितीय प्रांतपाल एम. जे. एफ. लॉयन भरत भलगट ह्यांनी कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी मार्गदर्शनपर भाषण केले. रिजन चेअरपर्सन लॉ. रामकुमार झाडे यांनी क्लबमध्ये सहभागी होणाऱ्या नवीन सदस्यांना सहभागी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तसेच झोन चेअरपर्सन लॉ. विकास घाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष लॉ.सतीश पवार यांनी ऐकजुटीने कार्य करण्याची हमी दिली. तसेच वर्षभरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन विविध क्षेत्रात काम करण्याचे माणसं दाखविले. गोरगरिबांना अन्नदान, पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविणे, शारीरिक तपासणी शिबिरा सोबतच मानसिक आरोग्याची जपणूक उपक्रम राबविणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप, आदिवासी विद्यार्थिनीच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम घेणे, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम वर्षभरात घेण्यात येतील, अशी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरवातीस लॉ. नितीन चांबुलवार यांनी ध्वजवंदना करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तर कार्यक्रमाची प्रास्ताविकता लॉ. डॉ. सविता सादमवार ह्यांनी केले आणि संचालन लॉ. प्रा. संध्या येलेकर आणि लॉ. संध्या चिलमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव लॉ. किशोर चिलमवार यांनी केले. याप्रसंगी लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी लॉ. बाळासाहेब पद्मावार, लॉ. घिसुभाई काबरा, लॉ. सुरेश लड़के, लॉ. नविनभाई उनाडकात, लॉ. शांतीलाल सेता, लॉ. भुजंग हिरे, लॉ. दिपक मोरे, लॉ. नादीरभाई भामानीं, लॉ. सुनील देशमुख, लॉ. प्रभु सादमवार, लॉ. देवानंद कामडी, लॉ. मनोज ठाकूर, लॉ. मदत जिवानी, लॉ. गिरीश कुकडपवार, लॉ. लक्ष्मीकांत पुट्टावार, लॉ. गुलाबराव मडावी, लॉ. पुरुषोत्तम वंजारी, लॉ. प्रशांत काळे, लॉ. परविन भामानी, लॉ. सुचिता कामडी, लॉ. रजनी हिरे, लॉ. निलिमा देशमुख, लॉ. प्रणाली वरखडे, लॉ. स्वाती पवार, लॉ. चेंबुलवार, लॉ. छायाताई पदमावार, लॉ.. भारती मडावी, लॉ. रुपाली काळे आणि तसेच नविन लॉयन सदस्य उपस्थित होते.

उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा केला सत्कार

मागील कार्यकारिणीमधील सादमवार यांना उत्कृष्ठ अध्यक्ष तर उत्कृष्ठ सचिव म्हणून लॉ. महेश बोरेवार आणि उत्कृष्ठ कोषाध्यक्ष ममता कुकडपवार यांना पुररकाराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ लॉ. म्हणून लॉ. शेषराव येलेकर तर बेस्ट लेडी लॉयनचा पुरस्कार लॉ. मंजुषा मोरे यांना प्राप्त झाला. बेस्ट लायन कपलचा पुरस्कार नादिरभाई भामानी आणि परवीन भामानी यांना  प्राप्त झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विधार्थी आणि उच्च पदवी मिळाल्याबद्दल लॉ. प्रभू सादमवार यांना सन्मानित करण्यात आले.