लॉयड मेटल्स कंपनीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा

9

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० ऑगस्ट : लॉयड मेटल्स एन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी क्रांतिकारक बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जेष्ठ मंडळीचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला कंपनीचे व्यवस्थापक साईकुमार, ऑपरेशन हेड जीवन हेडाऊ, गणेश शेट्टी, संजय चांगलानी आणि खदान परिसरातील अनेक जेष्ठ मंडळी, महिला व कंपनीमध्ये काम करणारे कामगार उपस्थित होते.