गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या विधानसभेत मांडणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

13

– गोंडवाना विद्यापीठाच्या समस्याबाबत आमदार डॉ. देवरावजी होळी यांची कुलगुरूंची चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न, विद्यापीठाच्या बांधकामाला लागणारा निधी, विद्यापीठासाठी लागणारी जागा, रिक्त पदे अशी विद्यापीठाची विवीध कामे आपण पुढाकार घेवून सोडवण्याचा प्रयत्न केला व त्यात यशही मिळाले. यापुढेही विद्यापीठात असणाऱ्या समस्या आपण प्राधान्याने विधानसभेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतजी बोकारे यांची भेट घेतल्यानंतर केले.

या भेटीदरम्यान आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विद्यापीठातील असणाऱ्या विद्यमान समस्या जाणून घेतल्या. त्या संदर्भात लागणारा पाठपुरावा आपण शासन, प्रशासन व मंत्रालय स्तरावर करू तसेच येथील असणारी रिक्त पदे भरण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असेही आश्वासन त्यांनी या भेटीदरम्यान कुलगुरूंना दिले.