कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोलीत स्वागत

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ जुलै : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोली नगरीत आगमनानिमित्त व त्यांची कॅबिनेट मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी आज, शनिवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर उपाध्यक्ष विवेक बैस आदी उपस्थित होते.