विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ७ जुलै : गडचिरोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हा प्रभारी सौ. योगीताताई प्रमोदराव पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 8 जुलै रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी 9 वाजता निर्मल विद्या मंदिर इंदिरानगर गडचिरोली येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम, सकाळी 10 वाजता इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री तथा न. प. गडचिरोलीचे माजी नगरसेवक श्री. प्रमोदराव पिपरे यांनी केले आहे.