कोनसरी प्रकल्प जिल्ह्यासाठी लाभदायक ठरणार : खा. अशोकजी नेते

46

– कोनसरी येथे पार पडली पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ जुलै : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे आज, शनिवारी पर्यावरण विभागाच्या वतीने जनसुनावणी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने घेण्यात आले. या पर्यावरण विषयक जनसुनावनीला खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, कंपनीचे डायरेक्टर (एमडी) प्रभाकरनजी, आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार दीपकदादा आत्राम, धनाजी पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणचे अधिकारीवर्ग, सात गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, परिसरातील जनता मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.

पर्यावरण विभागाच्या वतीने कोनसरी येथे घेण्यात आलेल्या लोक सुनावणीत खासदार अशोकजी नेते यांनी विचार मांडताना कोणतेही मोठे प्रोजेक्ट उभारायचे असल्यास पाणी, विज, जामीन, दळणवळणासाठी रस्ते, चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा ह्या गोष्टी असणे आवश्यक असते. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या ही अगोदर मोठा प्रोजेक्ट टाकण्यासाठी टाटा बिर्ला सुद्धा सुरजागडला येऊन गेलाय पण रस्ते, दळणवळणाची साधने, पाणी, वीज जमीन, रेल्वे लाईन नाही, ट्रान्सपोर्टनिग नाही, भौतिक सोयीसुविधा नाही. त्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला नाही. तरीपण मेसर्स लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातून सुरजागड – कोनसरी येथे मोठा प्रोजेक्ट निर्माण झाला. ही एक आपल्या जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे. सुरजागड- कोनसरी हा प्रकल्प एका एरियासाठी सिमित नसून गडचिरोली जिल्ह्यासाठी लाभदायक ठरेल. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना आणण्यासाठी माझा प्रयत्न राहिल. या पर्यावरण विषयक लोकसुनावणीमध्ये या परिसरातील सात गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य लोकांनी आपापली बाजू मांडली. तेव्हा त्यांचा एकच उद्देश व प्रश्न होता की, या ठिकाणी रोजगार, हवा, रस्ते पाहिजे, शिक्षण पाहिजे, आरोग्याच्या सोयी सुविधा पाहिजे, चांगल्या प्रकारे दवाखाना बनला पाहिजे जेणेकरून रुग्णांना मोफत सोयी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. अशा पद्धतीने लोकसुनावणीमध्ये लोकांनी विचार मांडले. मी जनतेच्या विचारांशी सहमत असून जनतेच्या पाठीशी आहे. प्रकल्पाच्या कंपनीने या परिसरातील ध्वनी प्रदूषण, जमीन प्रदूषण, जलप्रदूषण याकडे सुद्धा लक्ष देऊन उपाययोजना करावे, अशी अपेक्षा लोकसुनावणीत खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त केली.