– भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांची प्रमुख उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : 6 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून कोटगल मार्गावरील टी पॉइंट कॉम्प्लेक्स चौकाचे नवीन नामकरण वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक असे ठेवण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, रामायणजी खटी विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता प्रमुख चंद्रपूर विभाग, विहीप बजरंग दल गडचिरोली नगर अध्यक्ष नितेशजी खडसे, राजपूत समाजाचे अरुण पवार, मनोज पवार, भुपेद्रसिंग गौर, शिवसेनेचे राजुभाऊ कावळे, राजेंद्र कोरडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष विवेक बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी अजय पवार, प्रमोद पुण्यपवार, ऍड. कुंभारे, विशेषराव कोडापे, भाजप महिला आघाडीचे शहर सचिव निताताई बैस, सयोंजक बालाजी भांडेकर, रोशन आखाडे, सूरजजी काटवे, नीलिम कामडी, पवण वासेकर, संकेत भांडेकर व इतर कार्यकारिणी सदस्य तसेच राजपूत समाज उपस्थित होते.
या चौकाच्या नामकरणासाठी श्री. अरुणजी पवार, श्री. राजू जी कावळे, श्री. विवेकभाऊ बैस, श्री. राजुभाऊ खंगार आणि मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.