Home गडचिरोली आलापल्ली येथे श्री हनुमान जन्मोत्सव राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा

आलापल्ली येथे श्री हनुमान जन्मोत्सव राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा

103

– हरियाणा येथील महाबली हनुमान जनतेच्या आकर्षणाचा केंद्र, लोकांची तुडुंब गर्दी

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : टायगर ग्रुप आल्लापल्लीतर्फे भव्य हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग चौक व श्रीराम मंदिर येथे राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच संध्याकाळी मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री हनुमानाचे पूजन व आरती करीत भक्तीभावाने दर्शन घेतले. तसेच पायदळी ह्या शोभायात्रेत सहभागी झाले तसेच उपस्थित भक्तगणांना राजेंनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिले. यावेळी युवकांचा आग्रहास्तव डीजेच्या तालावर राजे साहेबांनी ठेका ही धरला तसेच ह्या शोभायात्रेत हरियाणा येथील महाबली हनुमान जनतेच्या आकर्षणाचे मोठे केंद्र होते. या शोभायात्रेत लोकांची तुडुंब गर्दी झाली होती. याप्रसंगी अहेरी व आलापल्ली येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!