विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील रामनगर, सोनापूर कॉम्प्लेक्स, विसापूर व हनुमान वार्डातील बुथ क्र. 117,118, 119, 121, 122 व बुथ क्र 105 या बुथावर भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा ध्वज फडकवून भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, ओबीसी आघाडी च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, महामंत्री रश्मीताई बाणमारे, शहर सचिव निताताई बैस, शहर उपाध्यक्ष पूनम हेमके, मुन्नी शर्मा, मडावी काकू, मंगला कोटगले, भारती शेंडे, धनश्री शिवणकर, वर्षा धकाते, मिनाक्षी नाईक, किरण सहारे, अश्विनी पारेकर, कुमेश्वरी पवार, रुपाली खांडरे, पिंकी हजारे व अन्य महिला उपस्थित होते.