27 मार्चला काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या समर्थनात व बीजेपीच्या निषेधार्थ गडचिरोलीत आंदोलन

17

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची वाढत चाललेली लोकप्रियता आणि हिडनबर्ग संस्थेने उघड केलेल्या अदानी समूहाच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी सतत आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबण्याकरिता नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सत्तेचा दुरुपयोग करत खासदारकी रद्द करण्याचा षडयंत्र केला. याचा निषेध म्हणून राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ व नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधार्थ आणि अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय चौकशीच्या प्रमुख मागणीकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 27 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता
इंदिरा गांधी चौक गडचिरोली येेथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान वाढत चाललेल्या हुकूमशाही विरोधात नागरी स्वाक्षरी अभियान सुद्धा राबविण्यात येणार आहे. तरी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व लोकशाहीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.