– इंदिरा गांधी चौकातील जाहीर निषेध आंदोलनात खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधी चौक येथे ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीर निषेधार्थ आंदोलनात खासदार अशोकजी नेते बोलताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी नेहमी सातत्याने वारंवार वादग्रस्त विधान करणारे राहुल गांधी हे नेहमी वक्तव्य करीत बोलत असतात. हा पंतप्रधानांचाच नव्हे तर अवघ्या देशातील जनतेचा व ओबीसी समाजाचा अवमान आहे. पंतप्रधान हे भारताचे नाही तर जगामध्ये लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ओळखले जाते व त्यांचे नाव सुद्धा लौकिक आहे. देशाचे प्रधानमंत्री यांना वारंवार अवमान करणारे, वादग्रस्त वक्तव्य विधान करणारे राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जाहीर निषेध केला. त्यामुळे आम्ही सहन करणार नाही व जनता सुद्धा देखील खपपून घेणार नाही, असे उद्धगार जाहीर निषेधार्थप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
पुढे बोलतांना आम्हचे नेते मंडळी किंवा प्रधानमंत्री, असे वादग्रस्त वक्तव्य कधीही बोललेले नाही किंवा कधीही काढले नाहीत. त्यामुळे बोलताना, वागताना शासन, प्रशासन, सुशासन, कायदा व्यवस्था, संविधानिक तरतुदी, संविधानिक याचा पुरेपूर विचार करूनच भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करित असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेमध्ये सभागृहात गेले तेव्हा पायथ्याशी पायऱ्यावर नतमस्तक होऊन या देशातील शेवटच्या घटकापर्यंत मग दिन असो, दलित असो, शोषित असो, पीडित, वंचित, सामान्य, मागास,
अल्पसंख्यांक असो, सर्वसाधारण नागरिक असो सेवा करण्याचा संकल्प केला. त्याच धर्तीवर देशसेवा, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा विचार मनात ठेवला. असे पंतप्रधान लौकिक, गौरवशाली,या देशाला पंतप्रधान म्हणुन लाभले. त्यामुळे त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे उद्धगार याप्रसंगी खासदार महोदयांनी केले.
याप्रसंगी अनेक पदाधिकारी, मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या निषेध आंदोलनात जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी निषेध आंदोलनात प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिलजी पारधी, जिल्हा सचिव अनिल पोहनकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे, ज्येष्ट नेत्या प्रतिभा चौधरी, माजी जि. प. सभापती रंजीता कोडाप, जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, तालुकाध्यक्ष नंदु पेट्टेवार, महामंत्री तालुका हेमंत बोरकुटे, माजी उपसभापती विलास दशमुखे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर उपाध्याय विवेक बैस, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री रशमी बनमारे, संजय मांडवगडे, दीपक सातपुते, श्रीकांत भुगुवार, भाजपा यु.मो.राजु शेरकी, ओमकार मडावी, बंडू झाडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.