वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेचे प्रेरणादायी विचार घराघरात पोहचवा : खा. अशोकजी नेते

120

– शिवणी येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव, संतस्मृती मानवता दिन व सामुदायिक प्रार्थना मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा- शिवणी ता. जि. गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रसंंत तुुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी महोत्सव, संतस्मृती मानवता दिन व सामुदायिक प्रार्थना मंदिराचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम खासदार अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळ शिवणीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी गुरुभक्तांना मार्गदर्शन करताना मागील दोन अडीच वर्षे कोरोणाच्या काळामध्ये गेले. कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे माणसाची माणुसकी हरवली होती. त्यामुळे असे धार्मिक कार्यक्रम घेता आले नाही. अशा या श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे मन आनंदित, प्रफुल्लित, शांत राहतो. त्याकरिता गुरुदेव सेवा मंडळाचे धार्मिक कार्यक्रमाची आज गरज आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील विकास कामाबाबत समस्या सुद्धा जाणून घेऊन उत्कृष्ट मार्गदर्शन केले. अशा या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्याच्या अध्यात्मिकतेमुळे मनाची एकाग्रता, चिंतन, अज्ञान दूर करून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशकडे नेण्याचा मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेच्या माध्यमातून अध्यात्मिकतेचे ज्ञान घेतले पाहिजे व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून चांगल्या संस्कारांची, आचार विचारांची देवाण घेवाण करणे आवश्यकता आहे. आज समाजामध्ये खऱ्याअर्थाने तरूण युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त दिसून येते. तसेच अंधश्रध्दा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये पोखरलेली दिसुन येते. त्याकरिता तरुण युवकांनी गुरुदेव सेवा मंडळाकडे, जास्तीत जास्त संख्येने वडून अध्यात्मिकतेचे धडे घेतले पाहिजे. त्यामुळे अशा या कार्यक्रमाचे आयोजन करणे आजच्या काळाची जगाला व देशाला गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले.

त्यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हासेवाधिकारी अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथजी कुंभारे, कुनघाडकर, तालुका महामंत्री तथा ग्रा. पं. सदस्य शिवणी हेमंत बोरकुटे, माणिक महाराज, तसेच मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त, बंधू आणि महिला भगिनीं व बालगोपाल उपस्थित होते.