श्रमदानातून केला हलामी टोला ते नागवेली रस्ता

40

 – ग्रामवासीयांनी घेतला पुढाकार: तीन किमीच्या रस्त्यामुळे परिसरात आनंद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पोटेगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील नागवेली ग्रामवासीयांनी पुढाकार घेऊन हलामी टोला ते नागवेली गावापर्यंत 3 किमी रस्ता श्रमदानातून तयार केला.रस्त्याची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून नागवेली गावापर्यंत रहदारी करणाऱ्यांना यामुळे आनंद झाला आहे.

परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून या रस्त्याची मागणी आहे.रस्ता नसल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. गावकरी, कर्मचारी,विद्यार्थ्यांना रस्ता नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत होता.शेवटी नागवेली ग्रामवासीयांनी एकत्र येऊन श्रमदानातून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. या रस्त्यामुळे आता परिसरातील नागरिकांना हलामी टोला ते नागवेली गावापर्यंत प्रवास करणे सोयीचे झाले आहे. श्रमदानाबद्दल आनंद व्यक्त होऊन नागवेली ग्रामवासीयांच्या प्रयत्नाचे परिसरात कौतुक होत आहे.

श्रमदानासाठी नागवेलीचे पोलीस पाटील दौलत नरोटे, जिल्हा परिषद शाळा नागवेली येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर परसा, सामाजिक कार्यकर्ते शामराव नरोटे, तुकाराम नरोटे,विनोद परसा,मंगळू नरोटे,नामदेव नरोटे,शामराव कोराम,कृष्णा वड्डे, धनिराम नरोटे,विश्वनाथ टोपो,तिवसू तिरकी, दिलसाय किंडो,मुकेश केरकेटा,राकेश तिग्गा,पत्रास तिग्गा,बुधरू केरकेटा, मरानुस तिग्गा ,मुख्याध्यापक अवेशकुमार दुर्गे, अंगणवाडी सेविका वनिता नरोटे,मीना परसा,स्मिता परसा,मानाबाई नरोटे, वंदना नरोटे,पोर्णिमा नरोटे,पुष्पा नरोटे,बुल्ली वड्डे,रमेश हलामी,महेश हलामी, गुणी नरोटे,करिष्मा नरोटे, सृष्टी तिरकी,ट्रॅक्टर मालक मनोज नरोटे, ग्रामवासी, विद्यार्थी आदींनी सहकार्य केले.