Home गडचिरोली पोटेगाव आश्रमशाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

पोटेगाव आश्रमशाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

110

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षिका प्रमिला दहागावकर, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, प्राथमिक शिक्षिका जयश्री रामगिरवार, अधीक्षिका लुंबिनी शंभरकर, मिराबाई कोडापे, संध्या गुंडमवार, ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, डॉ. एस. डी. गोटमवार, किशोर बेझलवार, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एम. नैताम, व्ही. एस. देसू , एन. पी. नेवारे, अधीक्षक एस. आर. जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे तसेच विद्यार्थिनी वनश्री कुमरे, शिवानी पोटावी आदी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बेहरे, प्रशांत बोधे, शांताराम उसेंडी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!