सकिनगट्टा येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलिबॉल सामन्यांचे उद्घाटन

31

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त सकीनगट्टा येथील हटा सावन की घटा क्लब द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामने, गावकरी पटांगणावर आयोजित केले होते या स्पर्धेचा उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सकिनगट्टा येथे नुकतेच संपन्न झाले. तत्पुर्वी गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने राजेंचे जोरदार स्वागत केले.

याप्रसंगी मनिषा गावडे सदस्य जि. प. गडचिरोली, बोड्डा गावडे माजी सभापती पं. स. अहेरी, एस.बी.जवादे मु. अ. जि. प. शाळा सकिनगट्टा, रैनू गावडे गाव पाटील, दामा गावडे, मादा गावडे, संदीप गावडे, व्येंकटेश तलांडी सरपंच ग्रा.पं. आरेंदा, आदीसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.