आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयॊजन

85

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ९ डिसेंबर २०२२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, १० डिसेंबर रोजी जिल्हयात फळवाटप, वृक्षारोपण व इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ९ वाजता आमदार डॉ. होळी मार्कंडा देवस्थान येथे भगवान मार्कंडेश्वराचे दर्शन घेतील व सकाळी १० वाजता चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्याचा कार्यक्रम होणार असून सकाळी ११ वाजता चामोर्शी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वा. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर, दुपारी १ वा. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात फळवाटप, दुपारी १:३० वा. चामोर्शी येथे गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप, दुपारी ३ वा. गडचिरोली पत्रकार भवन येथे गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने सत्कार व वाढदिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.