प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चवेला येथे जागतिक हिवताप दिन साजरा

71

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : धानाेरा तालुक्यातील गोडलवाही प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र चवेला येथे तालुका अधिकारी धानोरा डाॅ. अविनाश दहिफडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुणाल मोडक, तालुका आरोग्य सहाय्यक आनंद मोडक, आरोग्य सहायक मेश्राम, एमटीएस शंखावार याच्या मार्गदर्शनाखाली तसेच CHO दिक्षा गंधे, MPW श्रीकांत विशेषराव कोडापे, CANM सुलोचना सिडाम, आशा उर्मिला गावळे, शाळेतील मुख्याध्यापक दडमल आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत 25 एप्रिल राेजी जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात आला.

25 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “Accelerating the Fight Against Malaria for a more Equitable World”, “मलेरियाविरुध्द जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करु या लढा मलेरियाला हरविण्यासाठी” हे घोषवाक्य दिलेले आहे.

पावसाळा या ऋतुमध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांमध्ये वाढ होते व त्याचा उद्रेक होताे. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसारीत होणारे रोग अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुण्या, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर, झिका या सारखे आजार पसरवण्याचे काम डास करत असतो. त्यामुळे 25 एप्रिल राेजी जागतिक हिवताप दिवस साजरा करून जनजागृती करण्यात आली.