छल्लेवाडा येथील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी

89

– जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रेपनपली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. सदर विहीर व टाकीच्या भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. छल्लेवाडा येथे गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळत नव्हता, मात्र जि. प. अध्यक्ष यांच्याकडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असून भूमिपूजन संपन्न झाले. करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम, राजारामचे सरपंच श्री. नागेश कन्नाके, उपसरपंच सौ. सुरक्षाताई आकदर अँड. एच. के. आकदर, श्री. विलास बोरकर, गुलाब देवगडे, शंकर बासरकर, लक्ष्मण झाडे, राहुल सुंदिला, अशोक झाडे, वागू निमगडे, लक्ष्मण जनगाम, मनोहर बासरकर, रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी, नागेश ताटिपेली, महेश भगत, हनमंतू ठाकरे, प्रशांत गुरनूले, श्रीनिवास लेंडगुरे, मोंडी कोटरंगे, स्वामी ठाकरे, वसंत चव्हाण, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, सुरेश ठाकरे, किष्टाया गुरनूले, नारायण कोटरंगे, श्रीहरी गुरजाला, रवि चव्हाण, रवि सोतकु, रजित सभावा, सुरेश चव्हाण आदी परिश्रम घेतले. या मेळाव्याला परिसरातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.