मरपली येथे अजयभाऊ कंकडलवार यांनी नागरिकांशी विविध समस्यावर केेली चर्चा

47

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय मरपली अंतर्गत येत असलेल्या मरपली, भास्वापूर, करंचा गावातील विविध समस्या निर्माण झाली आहेत. पाण्याची, गली रस्ते, नाली व विद्युत खांब तसेच तलाव आदी प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी संवाद चर्चेत सांगितले. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष यांनी सांगितले कि, आपण या क्षेत्रातून पहिल्यादा निवडून दिले. त्यानंतर आदिवासी विध्यार्थी संघाकडून माझे सहकारी बंधु माजी जि. प. सदस्य श्री. अजय नैताम यांना निवडुन दिले असल्याने मी जि. प. अध्यक्ष या नात्याने रेपनपली-उमानूर क्षेत्रात जास्तीत जास्त निधी देवून या परिसराच्या विकास करण्यासाठी प्रयत्न केले असून भरपूर कामे सुरू आहेत. मात्र उर्वरित समस्याच्या निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर आहो असे सांगितले.या चर्चा सभेला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी पंचायत समिती सदस्या सौ. शारदा कोरेत, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा आत्राम, माजी सरपंच श्री. हनमंतू कोरेत, माजी उपसरपंच श्री. कार्तिक तोगम, प्रतिष्ठित नागरिक निलेश कूड़मेथे, बापू बेडकी, व्येंकटी कोंडागूर्ले, लचया सिडाम, शंकर कोंडागूर्ले, दिकोंडा,व गावातील नागरिक उपस्थित होते.