– जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत इंदाराम येथे आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान खरेदी केंद्र असून सदर धान खरेदी केंद्रात या हंगामातील धान खरेदी सुरू करण्यात येत असून आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामातील धान खरेदी केंद्रची विधीवत धान केंद्रची शुभारंभ करण्यात आले असून शासनने किंमत निश्चित केले असून धानाला २,०६०-२,०४०रुपये भाव घोषित केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात शेतकऱ्यांनी धानाची विक्री करावी, असे आवाहन जि. प. माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार केले. यावेळी इंदारामचे सरपंचा सौ. वर्षाताई पेंदाम, उपसरपंच श्री. वैभव कंकडालवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. गुलाबराव सोयाम, आ. वि. कार्य. सं. अध्यक्ष श्री. जयराम आत्राम, भीमा पेंदाम, श्रीनिवास कोतावडलावार, बाजीराव गावडे, तेजू दुर्गे, लालू मडावी, फकीरा पेंदाम, प्रकाश कोसरे, बिचू मडावी, सचिव तुमडे, सुखदेव पेंदाम, विश्वनाथ आत्राम, ग्रामसेवक किरंगे, ग्रा. कर्मचारी रोशन सम्मालवार, शेतकरी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.