उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

73
– हंसराज अहीर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित
– चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्रीय कार्यालयांना सुध्दा उच्चशिक्षित कामगारांकडून आवेदन
– मागण्यांंच्या सूचना जारी कराव्या : हंसराज अहीर
विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर : वेकोलि क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात यावी अशी सर्वप्रथम मागणी करणारे लोकप्रतिनिधी म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा उल्लेख होतो. त्यांच्या या संबंधातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सन 2016 मध्ये वेकोलित कार्यरत कामगारांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नौकरीत सामावून घेण्याचा निर्णय लागू करण्यात आला होता. परंतु वेकोलि प्रबंधनाच्या मनमानी धोरणामुळे हा हक्क डावलल्या जात होता. अखेर हंसराज अहीर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वेकोलि मुख्यालयाला वेकोलितील उच्चशिक्षित  प्रकल्पग्रस्त कामगारांचा हिरावून घेतलेला हा अधिकार बहाल करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
सन 2021-22 पासून चंद्रपूर जिल्ह्यातील पौनी-3, एकोणा व अन्य खाणींमध्ये प्रकल्पग्रस्तांना नौकरी देताना या निर्णयाची वेकोलिद्वारा अवहेलना केली जात असल्याचे निदर्शनास येताच नागपूर वेकोलि मुख्यालयातील बैठकांमध्ये या विषयावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गंभीरपणे चर्चा घडवून आणल्याने उच्चशिक्षित कामगारांना क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक, नागपूर क्षेत्र यांचेकडे आवेदन सादर करण्याच्या सूचना या क्षेत्रातील कामगारांना देण्यात आल्या आहेत.
सदर निर्णय यापूर्वीच लागू झाला असताना या निर्णयाला बगल देण्याचा प्रयत्न वेकोलि प्रबंधनाकडून केला जात असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करुन हंसराज अहीर यांनी वेकोलि मुख्यालयास या आशयाच्या सूूचना सरसकट चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलिच्या क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या जाव्यात, अशी मागणी केली आहे. यामुळे आयटीआय, इंजिनिअरींग (पदवी व पदविकाधारक), फार्मसी, हाॅटेल मॅनेजमेंट, एमबीए, एलएलबी व अन्य उच्चशिक्षित कामगारांचा गुणवत्तेचा हक्क डावलला जात होता. तो आता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
नविन एसओपीच्या नावाखाली चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मागील वर्षभरापासून आपल्या भूमिअधिग्रहण क्षेत्राव्यतिरीक्त अन्य क्षेत्रामध्ये विशेषतः नागपूर क्षेत्रातील भूमिगत खदाणीमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या. या संदर्भात सुध्दा हंसराज अहीर यांनी वेकोलि मुख्यालयात वेळोवेळी पार पडलेल्या बैठकांमध्ये नाराजी व्यक्त करीत हा विषय  उपस्थित केला होता. नुकत्याच आॅक्टोबर महिण्यात याबाबत तातडीने निर्णय घेण्याची सूचना सीएमडी यांना अहीरांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर उच्चशिक्षित वेकोलि कामगारांना आवेदन करण्याचे निर्देश महत्वपूर्ण व कामगारांना न्याय देणारे असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे. यापूर्वी अहीर यांच्याच प्रयत्नातून पीडीपीटी ट्रेनिंग धारकांना पाथाखेडा ऐवजी त्यांच्या ऐच्छीक क्षेत्रामध्येच ट्रेनिंग देण्याचा वेकोलि मुख्यालयाला निर्णय घेणे भाग पडले होते हे इथे उल्लेखनिय.