वाघाचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी

97

– भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वाघाचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेेेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री. मधुकर केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. आर. बी. इनवाते यांना देण्यात आले.
चामोशी तालुक्यातील ग्रामपंचायत विसापूर रै., आमगाव महाल, गट ग्रापं वालसरा, कुरुड, नेताजीनगर, भाडभिडी, माडेआमगाव, कुथेगाव, येडानूर, मुरमुरी, गौरीपूर, कर्कापल्ली, सोनापूर अंतर्गत विविध गावातील परिसरात पट्टेदार वाघाचे वास्तव्य दिसून आल्याने तसेच शेतीचे हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. काही गावांमध्ये मानवावर व तसेच पाळीव जनावरांवर पट्टेदार वागाने हल्ला करून त्यांना ठार मारले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंचे प्रचंड आर्थिक व मानवी नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच वाघाचा बंदोबस्त करण्यात याव याकरिता दिनांक 23 /11 /2022 रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शी येथे भेट देऊन माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. आर. बी. इनवाते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कुरुड उपसरपंच शेंडे, माजी उपसरपंच रमेश सातपुते, ग्रामपंचायत वालसरा माजी उपसरपंच लालाजी भोयर, वन समिती अध्यक्ष राजनगट्टा आनंदरावजी कोहळे, माजी ग्रामपंचायत सदस्य आमगाव म. लक्ष्मण वासेकर, साईनाथजी पिपरे रेखेगाव, टिकारामजी कोपूलवार, राजू शेट्ये वालसरा, महेश सातपुते वालसरा, अनमोल धोटे भिवापूर, देवानंद बारसागडे भिवापूर, विलास भांडेकर रेखेगाव, किशोर तोटपल्लीवार भिवापूर, भारत कसनवार वालसरा, सुधाकर कोठारे व आमगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.