सुरजागड लोह प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून जिल्ह्याच्या विकासाला चालना : खा अशोकजी नेते

62

– सुरजागड लोह प्रकल्पाचे उत्खनन क्षमता ३ दशलक्ष टन प्रतिवर्ष १० दशलक्ष टन वाढून मिळण्या संदर्भात लोकसुनावणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी प्रस्तावक मेसर्स लॉयर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, सुरजागड च्या आयरन व खान संदर्भात लोकसुनावणी निमित्याने गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी सुरजागड प्रकल्पाचे उत्खनन क्षमता ३ दशलक्ष टन प्रतिवर्ष १० दशलक्ष टन वाढून मिळण्यासंबंधी लोक सुनावणीच्या संदर्भात बोलताना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता, स्थानिक रोजगारांना काम मिळावा यासाठी , प्रकल्पाची गरज आहे. पण जिल्ह्यात मोठा प्रकल्प उभारायचे असेल तर वीज,चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, व जाग्याची व्यवस्था असणे सुद्धा गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रकल्पाची व उद्योगाची आवश्यकता आहे. त्याकरिता उद्योगपति रतनटाटा आले होते. पण त्यांना वीज, रस्ते, पाणी व जागेची कमतरता दिसल्याने तसेच दळणवळणाची सुविधा नसल्याने त्यांनी सुद्धा पाहणी करून गेले. आपल्या जिल्ह्यात लोहखनिज भरपूर प्रमाणात आहे,मॅग्नेट, हिरा,पन्ना, सोना सुद्धा भरपूर प्रमाणात आहे.कोणताही प्रकल्प उभारत असतांना येथील खनिज संपत्ती व पर्यावरणाला धोका होऊ नये, याकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

गडचिरोली जिल्ह्यात साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याचा उपयोग होत नाही. सुरजागड प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळावा रोजगाराची संधी मिळावी. खूप मोठी औद्योगिक क्रांती व्हावी या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून सामाजिक,आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच स्थानिक लोकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून कौशल्य साधने गरजेचे आहे, मायनिंग चा वर्किंग नॉलेज नसल्याने युवकांना रोजगार मिळत नाही. ते मिळवण्यासाठी, कौशल्य विकास साधने या माध्यमाद्वारे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देणे, शाळा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा इत्यादी सुविधा पुरविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते याप्रसंगी केले.

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते,गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाची गजबे, माजी आमदार दीपकदादा आत्राम, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलवार, जिल्हाधिकारी संजय मीना, धनाजी पाटील तसेच अधिकारी वर्ग, मोठया संख्येने नागरिक व तेरा १३ गावातील आलेले जनप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.