विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भाऊबीज व नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून भाजपचे जिल्हा महामंत्री श्री. प्रमोदजी पिपरे तथा गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या निवासस्थानी भाऊबीज (नारळी पौर्णिमा) चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
*याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, स्वयंसेवक या सर्वांना जिल्हा महामंत्री श्री. प्रमोदजी पिपरे यांची मुलगी कु. दर्शीता प्रमोद पिपरे हिने नारळ टाकून ओवाळणी केली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे यांची बहीण सौ. शैलाताई कुनघाडकर यांनी प्रमोदजी पिपरे यांना नारळ व दुपट्टा टाकून ओवाळणी घातली.
भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर कु. दर्शीता प्रमोद पिपरे हिनेही तिचा मोठा भाऊ अनुराग पिपरे याला नारळ टाकून ओवाळणी घातली. याप्रसंगी सर्व पिपरे कुटुंबीय अभाविप चे कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, स्वयंसेवक उपस्थित होते.