अहेरी, आलापल्ली येथील प्रतिष्ठानांना भेट देऊन राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केले लक्ष्मीपूजन

64

– व्यापाऱ्यांशी साधला आस्थेने संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दीपावली उत्सवातील लक्ष्मीपूजनाचा दिवस हा व्यापाऱ्यांसाठी सर्वात खास दिवस असतो. या दिवशी व्यापारी आपल्या प्रतिष्ठानात माता लक्ष्मी तथा भगवान गणेश यांचे पूजन करून नवीन व्यापारी वर्षांला सुरुवात करतात. या दिवशी व्यापाऱ्यांच्या खास निमंत्रनाने अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यानी २ दिवस अहेरी व आलापल्ली येथील अनेक प्रतिष्ठानांना भेट देवून लक्ष्मीपूजन केले.
यावेळी राजे साहेबांनी व्यापाऱ्यांशी आस्थेने संवाद साधला, तसेच यावेळी उपस्थित परंतु सद्या वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या कुटूंबियाशी नौकरी, शिक्षण ह्याबद्दल विचारपूस करीत, जेष्ठांच्या प्रकृतीचीही आवर्जून माहिती घेतली. यावेळी कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, संतोष उरेते, संतोष मद्दीवार, सूचित कोडेलवार, धनंजय मंथनवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.