खा. अशोकजी नेते यांनी देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

53

– कोसरी (देलनवाडी) लघु प्रकल्पाची निवेदनाद्वारे दखल घेतली

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत कोसरी (देलनवाडी) लघु प्रकल्पाने चुकीचा सर्वे करून पाटाचं पाणी शेतकऱ्यांना आवश्यक नसताना मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहाचा ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोसरी लघु प्रकल्प हा चुकीचा सर्वे असून हा प्रकल्प होऊ नये याकरिता शेतकऱ्यानी समस्या घेऊन खा. अशोकजी नेते यांना निवेदनाद्वारे कळविले.

तसेच शेतकऱ्यांच्या शेतातून चव्हेला प्रकल्पाचे पाट बनविण्याकरिता सर्वे केला आहे. परंतु प्रकल्पाचा सर्वे करतांना शेतकऱ्यांना या विषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. शेतीच्या बाजूने देलनवाडी येथील तलाव, लघु व उपलघु कालवा मुख्य पाटाला जोडला आहे,. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्ण जमिनी पाण्याच्या ओलिताखाली असून धान्य पिके सुद्धा चांगल्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. परंतु कोसरी प्रकल्प पुन्हा झाल्यास पाटाचे पाणी व तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसान होईल. याकरिता शेतकऱ्यांनी चिंता वर्तविली जात असल्याने यासंबंधी खासदार अशोकजी नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे ही बाब निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी भावना शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली.

खा. अशोकजी नेते यांनी तत्काळ दखल घेत संबंधित जिल्हा कार्यकारी अभियंता (लघू पाटबंधारे विभाग) यांना फोन लावून याविषयी अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून देऊन यासंबंधी पुन्हा (कोसरी) प्रकल्पाचा सर्वे करून शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घ्यावा, अशी सूचना याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी दिली.

याप्रसंगी देलनवाडी येथील शेतकरी गुलाब तु. सहारे, बाळकृष्ण मु. आखाडे, जिजाबाई या. घरात, हरबाजी घोडमारे, वासुदेव घोडमारे, शामराव धाईत, आबाजी कनाके, सुरेश पेंदाम, गिरमा वनस्कार, पुष्पा काटेंगे, ऋषी घोडमारे, अंबादास धोने, धोंडू टेंभुर्णे, मनाबाई चौधरी, दुधराम कांबळे, लालाजी चौधरी, ताराबाई धारणे, सुरेश ईकने, जीवन सयाम तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.