सेवा पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. योगिता मधुकर भांडेकर यांच्यातर्फे ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिप शाळांना भेट व मुलांना खाऊचे वाटप

119

– अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिली भेटवस्तू

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता महिला मोर्चा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. योगिताताई मधुकर भांडेकर यांच्यातर्फे चामोर्शी तालुक्यातील ग्रा. पंं. कुरुड, वालसरा, आमगाव (म.), विविध अंगणवाडी व जि. प. शाळांंना भेट देऊन मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भेटवस्तू देण्यात आले.

या कार्यक्रमाला तालुका महिला आघाडी अध्यक्ष माधवीताई पेशट्टीवार, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अनिताताई रॉय, माजी सरपंच भाविकाताई देवतळे आमगाव (म.), माजी सरपंच मेश्रामताई कुरुड, ग्रामपंचायत सदस्य निर्मला वासेकर, वैशाली आदे, चलाखताई कुरुड , माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमिलाताई बैस, जिल्हा युवा मोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर, कुरुड येथील सरपंच मडावी, आमगाव (म.) येथील माजी सरपंच सुभाष कोठारे, भाऊराव देवतळे, माजी उपसरपंच सातपुते, लालाजी भोयर, ग्रामपंचायत सदस्य निकेश जुवारे, गवारे, लक्ष्मण वासेकर भाजपा बुथ प्रमुख, ज्ञानेश्वर सातपुते, मनोज सातपुते, नितेश वासेकर, मनीष भांडेकर, महेश वैरागडे, शुभम मेश्राम व समस्त गावातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.