करमटोला येथील ढोने कुटुंबाला शिवसेनेने दिला आधार : शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली आर्थिक मदत

80

– मौशिखांंब-मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील करमटोला येथील व्याघ्रबळीची घटना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशिखांंब – मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील करमटोला परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकुळ घातला असून वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न केल्याने व्याघ्रबळीच्या घटनात वाढ होत आहे. करमटोला येथील शेतकरी कृष्णाजी ढोने हे घरची जनावरे चराईसाठी गावाजवळील जंगलपरिसरात गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची 9 सेप्टेंबर 2022 रोजी घटना घडली. या घटनेमुळे ढोने कुटंबियावर आघात कोसळला. शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी करमटोला येथे जाऊन ढोने कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून जनसेवेचा वसा जोपासून ढोने कुटुंबाला आर्थिक मदत दिली.अमिर्झा परिसरात गेल्या वर्षभरापासून नरभक्षक वाघाचे वास्तव्य आहे. या नरभ़क्षक वाघाने मागील वर्षभरात अनेक महिला नागरिकांचा बळी घेतला आहे. वाघाने दिभना गावातील तर तब्बल चौघांचा बळी घेतला आहे. व्याघ्रबळीच्या घटना वारंवार घडत असतानाही वनविभागाने त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त केलेला नाही. करमटोला येथील शेतकरी कृष्णाजी ढोने हे 9 सेप्टेंबर 2022 रोजी घरची गुरे चारण्यासाठी गावालतगत असलेल्या जंगल परिसरात गेले होते. जनावरे चारत असताना अचानक जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने ढोने यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती शिवसैनिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली. जनसेवेच्या कार्यात सदैव अग्रेसर असलेले कात्रटवार यांनी शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार सामाजिक बांधिलकी जोपासत वाघाचा बळी ठरलेल्या कृषणाजी ढोने यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. तसेच शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी यावेळी दिले. वाघाच्या घटेनमुळे करमटोला परिसरातील अनेक गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून याचा परिणाम शेती कामावर झाला आहे. गावाजवळील जंगलपरिसरात घरची जनावरे चराईसाठी नेल्यानंतर वाघाच्या हल्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे जनावरे कुठे चारावी व त्यांचे संगोपण कसे करावे, त्याचबरोबर शेतीची मशागत न केल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. अमिर्झा परिसरातील व्याघ्रबळीच्या घटनांबाबत वनविभागाने नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी वनविभागाला दिला आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या ढोने यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकूर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दजगाये, नानाजी काळबंधे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, सूरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, हेमंत चुधरी यांच्यासह शिवसैनिक व करमटोला येथील नागरिक उपस्थित होते.