विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजू आदिवासी नागरिकांना मिळावा, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमाातून “दिव्यांग नागरिक कृत्रिम अवयव उपकरण वाटप मेळावा” गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने तसेच अलिम्को कंपनी मुंबई, जनरल इन्श्युरंस कंपनी मुंबई, समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २०/०९/२०२२ रोजी पोलीस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृह गडचिरोली येथे पार पडला.
सदर दिव्यांग मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ४०० दिव्यांग नागरीक उपस्थित होते तसेच अतिदुर्गम भागातील ७० युवक-युवती ब्युटीपार्लर व फोटोग्रॉफी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यापैकी कृत्रिम अवयव उपकरणाची आवश्यकता असलेल्या २६० दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व्हिलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलित मोटार सायकल इत्यादी कृत्रिम अवयव उपकरणांंचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित करताना मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन दिव्यांगासाठी आरोग्य शिबिर राबवून १३४९ दिव्यांगांंना दिव्यांग प्रमाणपत्र, ६७० दिव्यांगांंना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, ८५० दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना, ४१० दिव्यांग नागरिकांना साहित्य वाटप, ४११ दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय इत्यादी साहित्य वाटप करण्यात आलेले आहेत
सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली पार पडला असून कार्यक्रमास मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. अनुज तारे, श्री. कमलेश यादव सी. एस. आर. कन्सलटंट, अलिम्को मुंबई, डॉ. कृष्णा मौर्या ऑडिओलॉजिस्ट, अल्मिको मुंबई, डॉ. निहांश, अल्मिको मुंबई, श्रीमती संगिता तुमडे, विकलांग समन्वयक आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी, पोस्टे / उपपोस्टे / पोमकेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि. महादेव शेलार, पोउपनि धनजय पाटील व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.