गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022 ची शारीरिक चाचणीची तात्पुरती गुणसूची यादी जाहिर

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – 2022 च्या 136 जागांसाठी दिनांक 19/06/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेनंतर दिनांक 12/07/2022 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती- 2022 ची अंतिम शारीरिक चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी प्रसारित करण्यात आली होती. शारीरिक चाचणीकरिता पात्र 1436 उमेदवारांची शारीरिक चाचणी दि. 06/09/2022 ते 08/09/2022 या दरम्यान घेण्यात आली होती. यातील सर्व उमेदवारांच्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. शारीरिक चाचणीकरीता पात्र 1097 उमेदवार शारीरिक चाचणीकरीता हजर होते.
सदर शारीरिक चाचणीची तात्पुरती गुणसूची यादी दिनांक 15/09/2022 चे सायंकाळी 05.00 वा. गडचिरोली पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट https://www.gadchirolipolice.gov.in/files/Recruitment/12.pdf यावर जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांच्या नावासमोर (#) हे चिन्ह आहे, त्यांच्या एकुण गुणांमध्ये ग़्क्क् चे माक्र्स समाविष्ट करण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांची सर्व माहिती जसे की रोल नंबर, संपुर्ण नाव, लिंग, जन्म दिनांक, शैक्षणिक माहिती, प्रवर्ग, समांतर आरक्षण, लेखी परीक्षेचे गुण, शारीरिक चाचणीचे गुण व एकुण गुण तपासून घ्यावे व याबाबत आक्षेप असल्यास दि. 17/09/2022 रोजीचे दुपारी 12.00 वा. पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्र. 8806312100 यावर किंवा उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे व्यक्तीगत आक्षेप नोंदवता येईल. आक्षेप नोंदविल्यानंतर सदर गुणसुची यादीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्र. 8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे संपर्क साधावा, असे कळविले आहे.