भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने वृद्धश्रमातील आश्रित वयोवृद्धांना फळ आणि जीवनाश्यक वस्तुंचे वाटप

67

– देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह निमित्त फळ व जीवनाश्यक वस्तुंचे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह निमित्ताने स्थानिक वृध्दश्रमातील आश्रित वयोवृद्धांना भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने फळ आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. योगीताताई भांडेकर व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, रश्मी बानमारे, माजी नगरसेविका लता लाटकर, अल्का पोहनकर, पुनम हेमके, रुपाली सातपुते, भावना हजारे, नीलिमा राऊत तसेच महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.