राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडीच्या विविध समस्यांंचा महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस यांनी घेतला आढावा

54

– रेखाताई डोळस यांनी गडचिरोली शहरातील 48 अंगणवाड्या घेतल्या दत्तक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे लाडके प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सेवा शासन, सुशासन व प्रशासन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी बद्दलच्या विविध समस्या लक्षात घेऊन विश्रामगृह गडचिरोली येथे महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या सौ. रेखाताई डोळस यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षक अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या समवेत आढावा घेतला आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन यासंबंधी मा. खा. अशोकजी नेते यांना निवेदनाद्वारे कळविले.

महिला आघाडीच्या प्रदेशा सदस्या सौ. रेखाताई डोळस यांनी याप्रसंगी अंगणवाडीच्या समस्या निदर्शनात आणून देताना गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, अविकसित जिल्ह्याची ओळख आहे. त्यासाठी अंगणवाडी हा सर्वप्रथम बालकांच्या सर्वांगीक विकासाचा पाया आहे. तसेच बालकांना सुसंस्कार मिळते, बालकांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी अंगणवाडीमधूनच बालकांची सुरुवात होते. त्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे. याकरिता जिल्हातील अंगणवाडीबद्दलच्या समस्या जाणून घेऊन रेखाताई डोळस यांनी निदर्शनास आणून दिल्या.

तसेच प्रदेश सदस्या सौ. रेखाताई डोळस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी दत्तक घ्यावी आणि तीन महिने अंगणवाडी कश्या पद्धतीने काम करतात याचा अहवाल केंद्राला द्यायचा आहे, असे सांगून रेखाताई डोळस यांनी स्वतः गडचिरोली शहरातील 48 अंगणवाड्या दत्तक घेतल्या.