मोदी सरकारचे आठ वर्ष हे भारताला विश्वात नंबर वन बनविण्याकरिता महत्त्वाचे : भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांचे प्रतिपादन

88

– कुरखेडा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीर्थ रॅलीचे आयोजन

– बाईक रॅलीत शेकडो युवक सहभागी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मोदी सरकारची आठ वर्ष हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे ठरले असून विश्वात भारताला नंबर वन बनवण्याकरिता हे आठ वर्ष महत्वाचे ठरले असून पुन्हा भारताला विश्वगुरू बनण्याकरिता मोदी सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी केले. ते कुरखेडा येथे भव्य बाईक रॅलीमध्ये सहभागी युवकांना संबोधन करताना बोलत होते.
भाजप सरकार केंद्रामध्ये आल्यापासून आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत. या कालावधीमध्ये केंद्र सरकारने तळागाळातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी सेवा, सुशासन ,गरीब कल्याणाच्या विविध जनकल्याण योजना राबवलेलेल्या असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कारण देशातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावे यासाठी सरकार कटिबद्ध असल्यामुळे जनसामान्यातुन सरकार बद्दल प्रेम, आपुलकीची भावना निर्माण होऊन आज सामान्यातल्या सामान्य नागरिक सरकारच्या पाठीशी उभे असताना दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून कुरखेडा येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीर्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन भाजपा जिल्हा संघटन महामंत्री गोविंद सारडा व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्वात करण्यात आले. भाजपा युवा मोर्चाची हि तीर्थ रॅली श्रीराम मंदिर श्रीराम नगर कुरखेडा येथून श्री गणेशा करून शहराला वेढा देत, हनुमान मंदिर कुरखेडा येथे बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी उपस्थित जिल्हा संघटन महामंत्री गोविंद सारडा,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, तालुका महामंत्री तथाा नगरसेवक अँड. उमेश वालदे, गडचिरोली शहर महामंत्री हर्षल गेडाम भाजयुमो जिल्हा सदस्य सुभाष उप्पलवार युवा मोर्चा नगरसेवक सागर निरंकारी, अतुल झोडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो तालुका महामंत्री तुषार कुथे, उपाध्यक्ष मंगेश मांडवे, धर्मा दरवडे, पुष्पराज राहंगडले, संकेत देशमुख, बंटी देवढगले, स्वप्निल खोब्रागडे हरीश तेलका, सोहेब पठाण, भाजयुमो जिल्हा सचिव प्रशांत हटवार, शुभम गोटेफोडे, भाग्यवान जांभुळकर, नितेश निरंकारी, कमलेश पाटणकर, दीपक सारे, मच्छिंद्र भोंडे, कोविंद वैरागडे व तालुक्यातील युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.