दहावी बोर्डाच्या परीक्षेत राणी दुर्गावती कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम

401

– शाळेचा निकाल १०० टक्के

– गुणवंत विद्यार्थिनींचा शाळेचे अध्यक्ष तथा आदिवासी सेवक घनश्यामजी मडावी यांच्या हस्ते केला सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नुकत्याच एसएससी बोर्ड परिक्षेचा निकाल 17 जूूू रोजी आभासी पद्धतीने जाहिर झाला असून सदर परिक्षेत राणी दुर्गावती कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी डोंगरवार हिने ९१.६० टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम आलेली आहे. तर वसुधा चाफले हिने ८७.१४ टक्के गुण प्राप्त करीत दुसरा तर लक्ष्मी बाळेकरमकर हिने ८६.६० टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच वैष्णवी शुद्धलवार, श्रृती दुधबावरे, सृष्टी डोईजड, छकुली मेश्राम, रिया सोमनकर, अनुराधा हजारे, जान्हवी साळवे व पल्लवी पोटावी या विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणीत पास झालेल्या आहेत. यावर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागला असुन शाळेने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या वतीने संस्थाध्यक्ष व आदिवासी सेवक घनश्यामजी मडावी, प्राचार्या वैशाली मडावी, पर्यवेक्षक पुरुषोत्तम ठाकरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक राजेश चु-हे, रेवन बोरकुटे, राजू पिलारे, विद्यार्थिनींचे पालक, निरज ढोढरे, आनंद मांडवगडे, डी. जे. ठेमस्कर, दिवाकर जेल्लावार, सुधाकर कन्नाके आदी उपस्थित होते.