अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रियंका झाडे हिने दहावीच्या परीक्षेत मिळविले 84 टक्के गुण

183

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रियंका बंडू झाडे या विद्यार्थिनीने इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 84.60 टक्के गुण मिळविले आहे. तिच्या यशाचे कौतुक केले जात आहे.
प्रियंका बंडू झाडे ही विद्यार्थिनी गडचिरोली शहरानजीकच्या वाकडी येथील रहिवासी असून गडचिरोली शहरातील विद्याभारती हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. ती सेमी इंग्लीशमध्ये 10 वीची परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. प्रियंका या विद्यार्थिनी सर्वसामान्य कुटुंबातील असून तिने इयत्ता 10 वीच्या परिक्षेत कोणत्याही ठिकाणी शिकवणी लावलेली नव्हती. शिवाय ती वाकडी या मूळ गावावरून ये- जा करीत होती. केवळ जिद्द, चिकाटी व नियमित अभ्यास यावर तिने हे यश प्राप्त केले आहे. तिला एकूण 500 पैकी 423 गुण मिळाले असून या गुणांची टक्केवारी 84.60 एवढी आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.