कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : खा. अशोकजी नेते

174

– मुलचेरा तालुक्यातील विविध विकास कामांंबाबत घेतला आढावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील विविध विकास कामाच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या पूर्णकाळात विविध क्षेत्रातील अधिकारी वर्गाणी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करा, असे प्रतिपादन आढावा बैठकीदरम्यान खा. अशोकजी नेते यांनी केले.
तसेच तालुक्यातील विविध विकास कामाबाबत सर्व विभागातील अधिकायांसोबत जसे कृषी विभागाचे अधिकारी, सिंचाई विभाग, वनविभाग, भूविभाग, आरोग्य विभाग, शैक्षणिक, बांधकाम, परिवहन महामंडळ, बँकिंग, MSEB चे अधिकारी या सर्व विभागातील विभागाच्या अधिकाऱ्यांना विविधविकास कामाच्या दृष्टिकोनातून मुलचेरा येथे विस्तारित बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना खा. अशोकजी नेते यांनी केले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, बाबुरावजी कोहळे विदर्भ संघटन मोर्चा तथा ओबीसीचे जेष्ट नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टि मोर्चा महा.प्रदेश,  प्रकाश दत्ता ता. अध्यक्ष, संदिप कोरेत आ. आघाडी जि. अध्यक्ष, कपिल हटकर तहसीलदार, कड PSI, सुभाष गणपती, विधान बैघ, बादल शहा, विजय बिश्वास, बासु मुजुमदार, संजु सरकार, उमेश सरकार, प्रतीभा भक्त ता.महिला अध्यक्ष, रहिम सिद्घिकु, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.