भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक सातपुते तर जिल्हा सचिवपदी प्रशांत हटवार यांची नियुक्ती

116

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी गडचिरोली येथील दीपक सातपुते यांची तर जिल्हा सचिवपदी कुरखेडा येथील युवा कार्यकर्ते प्रशांत हटवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी नियुक्ती केली.
दोन्ही नवनियुक्त पदाधिकारी यांचा गडचिरोली – चिमुर क्षेत्राचे खासदार तथा भाजपा आदिवासी आघाडी राष्ट्रीय महामंत्री अशोकराव नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी डोंगरे, युवा मोर्चा महा. प्रदेश सचिव अमित गुंडावार, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे भाजयुमो जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत खा.अशोकजी नेते यांनी भाजयुमो पदाधिकारी यांनी संघटन वाढीसाठी प्रयत्न करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनिलजी डोंगरे, मा.अमीतजी गुंडावार, चांगदेव फाये यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
नवनियुक्त पदाधिकारी यांचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, मंगेश रणदिवे, आशिष कोडापे, हर्षल गेडाम, प्रतीक राठी, सुभाष उप्पलवार, उल्हास देशमुख, पंकज खरवडे, जितेद्र ठाकरे, आकाश निकोडे, बंटी देवढगले भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.