शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या प्रयत्नामुळे अमिर्झा-मौशिख़ाब जिल्हा परिषद क्षेत्रात कोट्यवधींंच्या रस्ता कामांना सुरुवात

109

– शिवसेनेने जनसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची झाली फलश्रृती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा-मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली होती. जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले होते. प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्ते दुरूस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला. शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली. अमिर्झा-मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रात तब्बल ३ कोटी ७१ लाखांंची रस्ता दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली असून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या प्रयत्नामुळे गेल्या अनेक वर्षांंपासून प्रलंबीत असलेली अमिर्झा-मौशिखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची समस्या आता दूर झाली आहे. गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा-मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्याची समस्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबीत होती. रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याकड़े केली. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने १६ मार्च २०२२ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालया समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अमिर्झा-मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रात तब्बल ३ कोटी ७१ लाखाची ३ रस्त्यांची कामे मंजूर केली. या कामांना सुरवात झाली असून रस्त्याची समस्या दूर झाली आहे. कामे सुरू असलेल्या रस्त्यांमध्ये दिभना-अमिर्झा – मौशीखांब रस्त्याच्या विशेष दुरूस्तीचा समावेश असून या १३ किमी च्या कामासाठी१ कोटी ७७ लाख ६६ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उसेगाव – आंबेशिवणी.-गिलगाव या रस्त्याचे सुध्दा काम मंजूर करण्यात आले असून या ८ किमी च्या कामासाठी १ कोटी ९ लाख २३ हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आंबेशिवणी – भिकारमौशी- मौशीखांब या ६ किमी च्या रस्ता दुरूस्तीसाठी ८४ लाख ७८ हजारांंचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवसैनिकाच्या ‘धडाकेबाज’ प्रयत्नांमुळे दोन महिन्याच्या कालावधीतच तब्बल पाऊनेचार कोटीची रस्ता दुरूस्तीचे काम मंजूर झाली. त्यामुळे अमिर्झा-मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांनी श्री.अरविंदभाऊ कात्रटवार व शिवसैनिकांंचे आभार मानले आहे. आज कामाची प्रत्यक्षत्त पाहणी करण्यात आली या प्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संदीप भुरसे, सूरज उइके, संदीप अलबनकर, नानाजी काळबंधे, किशोर देशमुख, राहुल सोरते,निकेश लोहबरे,अरुण बारापात्रे,राजू जवादे,स्वप्निल खांडरे, ईश्वर लाजुरकर, विनोद मुतुमवार, जयपाल गोरतकार, दिलीप चनेकार, नेपाल लोहम्बरे, अविनाश झोडे, अजित कुकडकर, सुमित सोनटक्के, तानबा दाजगाये, रविंद्र बह्याळ, धनेश्वर ठाकरे, हरबा दाजगये, गोपाल मोगरकर, निरंजन लोहबरे, मोतीराम भुरसे, अनुराग चिचोलकर, अमित बानबले यांच्यासह या भागातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.