सुरजागड येथील लोह प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना कामामध्ये प्राधान्य द्यावे : खा. अशोकजी नेते

149

– सुरजागड येथील लोह प्रकल्पाला भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एक वर्षापासून सुरजागड हा प्रकल्प सुरू झाला. परंतु आलापल्ली, एटापल्ली येथील स्थानिक युवक बेरोजगारांना काम मिळत नाही. फक्त त्यांना स्थानिक म्हणून सेक्युरिटी गार्ड या पदावर घेतले जाते. परंतु आय.टि.सेक्टर किंवा इतर शैक्षणिक सेक्टर असुन सुद्धा स्थानिकांना कामावर घेतले जात नाही. हि बाब खा. अशोकजी नेते यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगितल्यावर प्रत्यक्ष सुरजागड लोह प्रकल्पाला भेट दिली.
त्यानंतर सुरजागड येथील लोह प्रकल्पाचे संचालक व कार्यकर्त्यांच्या समेत संपुर्णपणे लोह प्रकल्पाची पाहणी करुन कामकाजाची माहिती घेऊन आढावा बैठक घेण्यात आले. त्यावेळी लोह प्रकल्पाचे संचालक व्यंकटेश्ववराजी यांनी स्थानिक बेरोजगार युवकांनास कामावर घेण्यास प्राधान्य देऊ, असं सांगण्यात आले.
त्याप्रसंगी खा.अशोकजी नेते, स्वप्निलजी वरघंटे युवा मोर्चा प्रदेश सदस्य, प्र.संचालक व्यंकटेश्ववराजी, संदिपजी कोरेत जि. आ. आघाडी, विनोदजी आकलपलीवार जि. उपाध्यक्ष, निखिल गादेवार युवा मोर्चा, सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष, अशोकजी पुलीवार, डपावारजी आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.