जल, जंगल, जमिनीचा अधिकार मिळवून देणारे पहिले शहीद क्रांतीवीर : खा. अशोकजी नेते

108

– क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी घोट येथे साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची घोट येथे 122 व्या पुण्यतिथी निमित्त देशाचे लाडके पंतप्रधान यांचे 8 वर्ष पूर्ण झाल्याने अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परकीय, राजकीय व्यवस्थेविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन पुकारून आदिवासी समाजासाठी लढा देणारे, क्रांतिसूर्य, जननायक, महानस्वातंत्र्य सेनानी, भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खा. अशोकजी नेते यांनी प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी “जनजाती गौरव दिवस” जाहीर करून आदिवासींना न्याय दिला आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र वचनाप्रमाणे आदिवासींना जीवनाची वाटचाल करावी. असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले. तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आदिवासी शहीदवीरांचे देशात 75 स्मारक व संग्रहालय होणार आहेत. 8 वर्षात आदिवासीच्या विकासासाठी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी बजेटच्याा माध्यमातून तीन लाख बेचाळिस हजार नववे ऐकोनचाळिस कोटी निधी दिला व भारतीय संविधान अनुच्छेदनुसार एक लाख दोनहजार कोटी रुपये आदिवासी विकासाकरिता दिला आहे, असे प्रतिपादन प्रकाश गेडाम यांनी केले.
याप्रसंगी नामदेवराव सोनटक्के यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्यावेळी मा. खा. अशोकजी नेते, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्रीअनु. जनजाति मोर्चा प्रकाशजी गेडाम प्रदेश महामंत्री भाजपा अनु.जनजाति मोर्चा, नामदेवराव सोनटक्के माजी जि. प. सदस्य, विलासजी उईके तालुकाध्यक्ष, आदिवासी आघाडी मोर्चा चामोर्शी, स्वप्निलभाऊ वरघंटे भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य, दिलीपजी चलाख तालुकाध्यक्ष, भाजपा चामोर्शी, ऋषीजी कोडापे, रमेश कन्नाके, चंद्रकलाताई तसेच अनेक आदिवासी बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.