गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक एड्स दिन सप्ताह निमित्त २ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश कृष्णराव पाटील यांच्या नेतृत्वात ‘एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये महाविद्यालयाचे इंचार्ज प्राचार्य डॉ. प्रमोद बोधाने, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. कुंदन दुफारे, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, प्रा. अनिल चाहंदे, प्रा. मेघा भास्करवार, प्रा. गडसुल्रवार, प्रा. ठाकरे व महाविद्यालयातील १२२ विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये विद्यार्थिनीनी ‘विश्व एड्स दिवस मनाएंगे इसके प्रति अलख जगायेंगे, एड्स से बचाव हि एड्स का विकल्फ है, एड्स रोगियों को बचावो, इसे ना तुम सताओ’ अश्या प्रकारचे अनेक स्लोगन म्हणत गडचिरोली परिसरातील लोकांमध्ये एड्स रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. एड्स रॅली यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयतील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. गेड़ाम, श्री. दागमवार, श्रीमत वाईलकर, श्री. धानोरकर, श्री. ठाकरे, श्री. भोयर, श्री. पंकज धुडसे, श्रीमती मेघा मड़ावी यांनी सहकार्य केले.




